धाराशिव – दिवसभरात 8 रुग्णांची वाढ, कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला 26 वर

1056

वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील मुलाबरोबर आता त्याचे आई – वडीलही कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहीती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा आता 26 वर पोहोचला आहे. यातील चार रुग्ण बरे होवून घरी गेले असून उर्वरित 22 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

वाशी तालुक्यात कोरोनाचा मुंबईहून प्रवेश झाल्याने तालुक्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री प्रलंबित असलेले अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाले आहे. या अहवालानुसार, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 6 ने वाढली आहे. यासह आणखी दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

…तर हाहाकार उडाला असता, आरोग्य मंत्रालयाने सांगितले कोरोना नियंत्रणात असल्याचे कारण

वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी ) या गावातील एक नागरिक कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र त्याच्या आई-वडीलांचे रिपोर्ट येणे बाकी होते. येथील कोरोना बाधित कुटुंबातील 6 व्यक्ती व एक वाहन चालक असे 7 जण एका स्वतंत्र वाहनाने मुंबई येथील जोगेश्वरी या ठिकाणावरून वाशी तालुक्यात बुधवार, 20 मे रोजी आले होते. त्या कुटुंबाने वाशी ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून पिंपळगाव (लिंगी) या गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. तपासणी करून गावाकडे जात असतानाच वाशी नगरपंचायतचे नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी यांना हे कुटुंब कोरोना संशयित असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी वाशी ग्रामीण रुग्णालयात दूरध्वनीद्वारे संपर्क करून या रुग्णांच्या विषयी माहिती दिली. या नंतर वाशी ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने त्या कुटुंबाला कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या वस्तीग्रहामध्ये क्वारंटाईन कक्षामध्ये दाखल केले होते.

जेवण वाटता-वाटता भीक मागणाऱ्या तरुणीच्या पडला प्रेमात, लग्नही केल्याने सोशल मीडियावर चर्चा जोमात

गुरूवारी 3 व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी लातुर येथे पाठवले होते. त्यामध्ये 6 वर्षीय मुलाचा री पोर्ट पॉझिटिव्ह निघाला होता व 2 व्यक्ती निगेटिव्ह निघाले आहेत. 4 जणांचे अहवाल येणे बाकी होते. ते अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाले. यातील दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह निघाले आहेत. वरील तिन्ही रुग्णांना उपचारासाठी कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या