
कोरोनामुळे राज्यासह देशभरातील थिएटर बंद असल्यामुळे मनोरंजनासाठी प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती देत आहेत. जुलै महिन्यातदेखील दमदार वेब सिरीज आणि सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
समांतर-2 – स्वप्नील जोशीची वेब सिरीज समांतर-2 गुरुवारपासून भेटीला आली आहे. सुदर्शन चक्रपाणी (नितीश भारद्वाज) यांचे कर्म जे आता कुमार महाजनचे (स्वप्नील जोशी) भविष्य आहे. कुमार त्याला आव्हान देतो, मात्र त्यात तो यशस्वी होईल का, हे यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘समांतर-2’ मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलगू या भाषांमधून एमएक्स प्लेअर एक्सक्लुझिव्हवर पाहता येईल.
हंगामा-2 – ‘हंगामा-2’ हा सिनेमा 23 जुलैला डिस्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मिजान जाफरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
फिल्स लाईक इश्क – 23 जुलैला नेटफ्लिक्सवर ‘फिल्स लाईक इश्क’ ही लघुपटांची सिरीज रिलीज होणार आहे. या सिरीजचे दिग्दर्शन रुचिर अरुण, ताहीर कश्यप खुराणा, आनंद तिवारी, दानीश अस्लम, जयदीप सरकार, सचिन पुंडालकर आणि देवरथ सागर यांनी केले आहे.
तुफान – फरहान अख्तरचा बहुचर्चित तुफान सिनेमा अमेझॉन प्राईम व्हिडिओवर एकाच वेळी हिंदी आणि इंग्रजीत 16 जुलैला प्रदर्शित होत आहे. मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक-शहा आणि हुसेन दलाल यांच्याही यात मुख्य भूमिका असून दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा आहेत. डोंगरी भागातील गुंड अज्जू ते बॉक्सिंग चॅम्पियन अजीज अली असा प्रवास यात पाहायला मिळणार आहे.





























































