चांदा ते बांदा योजनेतील आऊटबोट इंजिनचे मालवणातील मच्छीमारांना वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

चांदा ते बांदा योजनेतून राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आऊटबोट इंजिनचे वाटप मंगळवारी मालवण धुरीवाडा येथील लाभार्थ्यांना करण्यात आले. यात हनुमंत वेंगुर्लेकर, योगीराज शिर्सेकर, ललित कुबल, विशाल गोवेकर या मच्छिमारांचा समावेश आहे.

यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त राजकुमार महाडिक, परवाना अधिकारी सतीश खाडे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी संतोष देसाई, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, जोगी, नगरसेवक पंकज सादये, शिवसेना तालुकाप्रमुख शिंदे, राजू कुर्ले, किशोर वेंगुर्लेकर, लीलाधर सावबा, शरद जोशी, सोनू माणगावकर, गणपत आडिवरेकर, राकेश वेंगुर्लेकर, सुशील तारी, बाबू वेंगुर्लेकर, आबा शिर्सेकर, दादू शिर्सेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

मासेमारी बोटींवर वापरल्या जाणाऱ्या दीड लाख किमतीच्या या इंजिन पैकी ५० टक्के रक्कम शासन अनुदान देते. मच्छीमारांनी या योजनेचे लाभ घ्यावा असे आवाहन हरी खोबरेकर यांनी यावेळी केले.