
पुण्यातील ससुन रुग्णालयात चतुर्थ श्रेणींच्या 354 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी तब्बल 26 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. राज्यात बेरोजगार तरुणाईंची संख्या किती मोठया प्रमाणात वाढली आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे. 354 जांगासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने ससूनमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांची 354 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कक्षसेवक 168, आया 38, सेवक 36, पहारेकरी 23, शिपाई 2, क्ष-किरण सेवक 15, हमाल 13, रुग्णपटवाहक 10, सहायक स्वयंपाकी 9, नाभिक 8, स्वयंपाकी सेवक 8, प्रयोगशाळा सेवक 8, बटलर 4, दवाखाना सेवक 4, माळी 3, प्रयोगशाळा परिचर 1, भांडार सेवक 1, गॅस प्रकल्प चालक 1 या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.