
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सदस्यपदासाठी 51 हजार 72 अर्ज दाखल झाले आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी 4 हजार 198 अर्ज दाखल झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. शेवटच्या दिवशी सर्व विभागात अर्ज भरण्यासाठी उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या.
छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक अर्ज
छत्रपती संभाजीनगर विभागात बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड आणि परभणी जिह्यातून सदस्यपदासाठी सर्वाधिक 11 हजार 811 अर्ज दाखल झाले, तर अध्यक्षपदासाठी 1192 अर्ज दाखल झाले.
अमरावती विभाग: अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ या जिह्यांमधून सदस्यपदासाठी 8492, तर अध्यक्षपदासाठी 693 अर्ज दाखल.
नागपूर विभाग: भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर वर्धा जिह्यातून सदस्यपदासाठी 7125, तर अध्यक्षपदासाठी 577 अर्ज दाखल.
कोकण विभाग: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिह्यात सदस्यपदासाठी 3010, तर अध्यक्षपदासाठी 200 अर्ज दाखल.
नाशिक विभाग: अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या जिह्यातून सदस्यपदासाठी 9590, तर अध्यक्षपदासाठी 713 अर्ज दाखल.
पुणे विभाग: कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा,सोलापूर जिह्यातून सदस्यपदासाठी 11044, तर अध्यक्षपदासाठी 823 अर्ज दाखल.



























































