ओवैसी यांनी बिहारमध्ये भाजपची मदत केली, यूपी-बंगाल मध्येही साथ देतील – खासदार साक्षी महाराज

असदुद्दीन ओवैसी यांचा ‘MIM’पक्ष म्हणजे भाजपची ‘बी’ टीम असल्याचे विरोधकांकडून आरोप केले जातात. त्यावर भाजप खासदारांच्या विधानाने शिक्कामोर्तब झाल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

असदुद्दीन ओवैसी हे सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात आल्यावर सत्ताधारी पक्षाकडे दुर्लक्ष करत समाजवादी पक्षावर टीका केली. यावरून समाजवादी पक्षाने एमआयएम ही भाजपची ‘बी’ टीम असल्याची तक्रार केली होती. कन्नोज येथील भाजप खासदार साक्षी महाराज यांना पत्रकारांनी याच संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी बिहारमध्ये एमआयएमने भाजपला साथ दिल्याचे विधान केले आहे.

साक्षी महाराज म्हणाले ‘असदुद्दीन उत्तर प्रदेशात आले हे खूप चांगलं आहे, ईश्वर त्यांना ताकद देवो. खुदा त्यांना साथ देवो. त्यांनी बिहारमध्ये आम्हाला साथ दिली होती, यूपी आणि नंतर प. बंगाल मध्येही ते साथ देतील.’

त्यांच्या या विधानानंतर साक्षी महाराज आणि भाजपवर समाजवादी पक्षाने टीका केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या