तुरुंगात उशी, खुर्ची देत नसल्यामुळे मला पाठदुखी होतेय, चिदंबरम यांची तक्रार

734

आयएनएक्स मीडिया घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात कैद असलेले काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी त्यांना उशी व खुर्ची दिली जात नसल्याने त्यांना पाठदुखीचा त्रास होत असल्याचे न्यायालयात सांगितले आहे. गुरुवारी न्यायालयात त्यांच्या न्यायालयीन कोठडीवर सुनावणी होत असताना त्यांनी ही तक्रार केली आहे.

‘तुरुंगात चिदंबरम यांना उशी व खुर्ची दिली जात नाही. त्यामुळे त्यांना पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. त्यांच्या सेलबाहेर दोन तीन खुर्च्या होत्या. ज्यावर वॉर्डन वगैरे तसेच ते देखील बसायचे मात्र काही दिवसांनी त्या देखील तिथून काढून टाकण्यात आल्या आहेत’, अशी तक्रार चिदंबरम यांचे वकिल कपिल सिब्बल यांनी केली आहे.

पी चिंदंबरम यांना आयएनएक्स मीडियाप्रकरणी 21 ऑगस्टला दिल्लीयेथून सीबीआयने अटक केली आहे. त्यानंतर त्यांची दिल्लीतील तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांच्या दिल्लीतील रोझ अव्हेन्यू न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या