मराठी रंगभूमीवरील सुवर्णकाळाला उजाळा, ‘प्र.ल.’ माहितीपट आज सह्याद्री वाहिनीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अग्निपंख, दीपस्तंभ, रातराणी, गंध निशिगंधाचा, डॅडी आय लव यू, पांडगो इलो रे बा इलो, तक्षकयाग यासारख्या मराठी रंगभूमी गाजवणाऱया नाटकांच्या इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे. ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 18 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी समर्थ रंगभूमी निर्मित ‘प्र. ल.’ हा 25 मिनिटांचा माहितीपट प्रसारित होणार आहे. प्र. ल. मयेकरांनी लिहिलेल्या एकांकिका, नाटक, चित्रपट, मालिका आणि कथासंग्रहाच्या इतिहासाबरोबर त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक दिग्गज मंडळींनी सांगितलेले अनुभव, आठवणींनी हा माहितीपट अधिकच दर्जेदार ठरलाय. प्र. ल. माहितीपटाची संकल्पना आणि लेखन दुर्गेश आखाडे यांची आहे. निवेदन अभिनेता अविनाश नारकर, प्रमोद पवार आणि अभिनेत्री मयुरा जोशी यांनी केले आहे.