
>> दुष्यंत पाटील
रॅडेट्झकींच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रियन सैन्यानं इटालियन सैन्याशी लढाई जिंकली. रॅडेट्झकी या लढाईचे नायक बनले. लढाई संपल्यानंतर विजयी ऑस्ट्रियन सैन्य राजधानी असणाऱया व्हिएन्ना शहरात परतले. व्हिएन्ना शहरात येताना हे सैन्य त्या काळात लोकप्रिय असणारं एक लोकगीत गात होते. ही गोष्ट विख्यात ऑस्ट्रियन संगीतकार स्ट्रॉस यानं पाहिली होती. रॅडेट्झकींच्या सन्मानार्थ एक संगीत रचना करण्याचं काम स्ट्रॉसकडं आलं होतं.
एकोणिसाव्या शतकात इटलीचा प्रदेश ऑस्ट्रियन साम्राज्याचा भाग होता. इटलीतल्या लोकांना परकीयांपासून स्वातंत्र्य हवं होतं. 1848 मध्ये इटलीतल्या मिलान या शहरात लोकांनी उठाव केला. ऑस्ट्रियन शासकांचे आदेश मानण्यास त्यांनी सरळ सरळ नकार द्यायला सुरुवात केली. या उठावाचं स्वरूप इतकं उग्र होतं की, शहरामधल्या ऑस्ट्रियन लष्करप्रमुख रॅडेट्झकी आणि इतर सैनिकांना अक्षरश: शहर सोडून पळून जायला लागलं. हे सारं 1848 च्या मार्च महिन्यात घडलं.
लष्करप्रमुख रॅडेट्झकींचं वय 80 पेक्षा जास्त असलं तरी त्यांच्यातली तडफ, ऊर्जा एखाद्या तरुणासारखी होती. खरं तर इटलीतल्या लोकांचा उठाव त्यांना चिरडून टाकायचा होता, पण इटलीतले लोक लढण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. बंदुका घेऊन त्यांनी ऑस्ट्रियन सैनिकांवर गोळीबार करायला सुरुवात केली होती. ही परिस्थिती नियंत्रणात आणणं शक्य नव्हतं. त्यामुळं रॅडेट्झकींना सैनिकांसहित पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
पळून गेलेल्या ऑस्ट्रियन सैनिकांनी उठाव करणाऱया इटलीतल्या काही लोकांना बंदी बनवून घेतलं होतं. या सैनिकांनी काही किल्ल्यांमध्ये आश्रय घेतला. किल्ल्यांमध्ये बंदी बनवलेल्या लोकांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. या काळात इटलीचा काही भाग स्वतंत्र झाला होता.
पुढचे काही महिने रॅडेट्झकी आणि त्यांचे सैनिक किल्ल्यांमध्येच राहिले. कालांतराने रॅडेट्झकी आणि किल्ल्यात अडकलेल्या सैनिकांच्या मदतीसाठी आणखी काही ऑस्ट्रियन सैन्य पाठवण्यात आलं. यानंतर इटलीच्या उत्तर भागातल्या कस्टोझा नावाच्या ठिकाणी ऑस्ट्रियन सैन्याची इटालियन सैन्याशी लढाई झाली. 1848 च्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ही लढाई झाली. रॅडेट्झकींच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रियन सैन्याने इटालियन सैन्याशी लढाई जिंकली. रॅडेट्झकी या लढाईचे नायक बनले.
लढाई संपल्यानंतर विजयी ऑस्ट्रियन सैन्य राजधानी असणाऱया व्हिएन्ना शहरात परतले. व्हिएन्ना शहरात येताना हे सैन्य त्या काळात लोकप्रिय असलेलं एक लोकगीत गात होते. ही गोष्ट विख्यात ऑस्ट्रियन संगीतकार स्ट्रॉस याने पाहिली होती. रॅडेट्झकींच्या सन्मानार्थ एक संगीत रचना करण्याचं काम स्ट्रॉसकडं आलं होतं.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटी व्हिएन्नामध्ये हेमंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी ‘हेमंतोत्सवा’चा कार्पाम होणार होता. असा कार्पाम दरवर्षी होत होता. काहीसं जत्रेसारखं या कार्पामाचं स्वरूप होतं. या कार्पामात प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीमध्ये मोठय़ा संख्येने शासकीय अधिकारी, लष्करी अधिकारी आणि सैनिक यांचाही समावेश होता. या कार्पामात संगीतही सादर करण्यात आलं.
कार्य़क्रमात सर्वात शेवटी रॅडेट्झकींच्या सन्मानार्थ रचलेलं ‘रॅडेट्झकी मार्च’ हे संगीत सादर केलं गेलं. चटकन मनाची पकड घेणारी अशी ही संगीत रचना होती. विजयी सैन्य व्हिएन्नामध्ये परतताना जे लोकगीत गात आलेले होते, त्यातलं संगीतही स्ट्रॉसने या संगीत रचनेत समाविष्ट केलं होतं. हे विजयाचं संगीत होतं, प्रेरणादायी संगीत होतं. हे संगीत लोकांना किती आवडावं? लोक ही संगीत रचना पुन: पुन्हा सादर करण्याची मागणी एकसारखी करत होते. हे संगीत एकूण पाच वेळा सादर केल्यानंतरच लोक थांबले.
‘रॅडेट्झकी मार्च’ ही संगीत रचना पाश्चात्त्य संगीताच्या इतिहासातली अजरामर रचना ठरली. ऑस्ट्रियामध्ये या संगीत रचनेला आजही अक्षरश: राष्ट्रगीतासारखा मान आहे. बर्लिऑझ नावाचा एक विश्वविख्यात संगीतकार म्हणतो की, जोपर्यंत यासारख्या (रॅडेट्झकी मार्चसारख्या) संगीत रचना होत राहतील, तोपर्यंत युध्दे होत राहतील. ऑस्ट्रियन साम्राज्यासाठी हे संगीत इतकं जवळचं झालं की, जोसेफ रॉथ नावाच्या लेखकाने ऑस्ट्रियन साम्राज्याच्या पतनाशी संबंधित 1932 मध्ये लिहिलेल्या आपल्या कादंबरीचं ‘रॅडेट्झकी मार्च’ असं नाव ठेवलं.
नंतरच्या काळात रॅडेट्झकी मार्चचं संगीत असंख्य ठिकाणी वापरलं गेलं. आजच्या काळात ऑस्ट्रियाच्या फुटबॉलच्या सामन्यांमध्ये हे संगीत वाजवलं जातं. कित्येक लष्करी प्रशिक्षण संस्था हे संगीत वापरतात. इंग्रज सैन्याच्या एका रेजिमेंटने लष्करी संचलनासाठी हे संगीत निवडलं आहे. आज दीडशे वर्षांनंतरही ही संगीत रचना इतकी लोकप्रिय असावी हे पाहण्यासाठी ‘’Radetzky March’ ही संगीत रचना आपण एकदा तरी यूटय़ूबवर ऐकायलाच हवी! [email protected]





























































