पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांना दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान

331

उंडाळे (ता. कराड) येथील स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर स्मारक समितीकडून स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 46 व्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी आयोजित केले जाणारे 37 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन मंगळवारी संपन्न झाले. या अधिवेशनात बडोदा (गुजरात) येथील आदिवासी भाषा संशोधन प्रकाशन केंद्राचे संस्थापक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांना यावर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

1942 साली दादा उंडाळकर यांनी या भूमीत क्रांतीची बिजे रोवली. या पुण्यभूमीत दिला जाणारा हा पुरस्कार आपण नम्रतेने नव्हे तर हक्काने स्वीकारत आहोत. उंडाळेच्या पुण्यभूमीत 1942 साली झालेल्या क्रांतीने जगाला दिशा दिली, असे गौरवोद्गार डॉ. गणेश देवी यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना काढले. ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र यादव यांनी डॉ. गणेश देवी यांच्या आजपर्यंतच्या कार्यात रवींद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी यांच्या कार्याची छबी आपणास दिसत असून त्यांना सन्मानित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

हा पुरस्कार स्वराज्य अभियान संघटनेचे संस्थापक योगेंद्र यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दादासो गोडसे, पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे, पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे, सुभाष वारे, सुरेखाताई देवी, दादा उंडाळकर स्मारक समितीचे व्यवस्थापकीय विश्वस्त प. ता. थोरात, माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, प्रा. धनाजी काटकर, विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, रयत संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपली प्रतिक्रिया द्या