
महाराष्ट्रातील अरण्यऋषी अशी ओळख असलेले ज्येष्ठ साहित्यिक, वन्यजीव संशोधक मारुती चित्तमपल्ली यांचं वृद्धापकाळानं निधन झालं.ते 93 वर्षांचे होते. नुकताच 30 एप्रिल 2025 रोजी त्यांचा पद्मश्री हा नागरी सन्मान देऊन गौरव करण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वीच ते रुग्णालयातून घऱी परतले होते.

































































