हौसेला मोल नाही! 110 वर्षांच्या आजोबांनी केलं चौथं लग्न

एका 110 वर्षांच्या वृद्धांनी चौथ्यांदा लग्न केल्याची घटना पाकिस्तानात घडली आहे. विशेष म्हणजे या आजोबांच्या कुटुंबात 84 माणसं राहतात. त्यात आता अजून एका व्यक्तिची भर पडली आहे. त्यांची पत्नी त्यांच्याहून निम्म्या वयाची आहे.

या आजोबांचं नाव अब्दुल हन्नान स्वाति असं आहे. त्यांचं वय 110 इतकं आहे. त्यांना 12 मुलगे आहेत. त्यात सहा मुलगे आणि सहा मुली आहेत. त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा 70 वर्षांचा आहे. त्यांच्या कुटुंबात 84 सदस्य आहेत. आता त्यांनी खैबर प्रांतातील मनसेहरा जिल्ह्यातील एका मशिदीत 5 हजार रुपये मेहेर देऊन चौथा विवाह केला. या लग्नावेळी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.

त्यांच्या या लग्नावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या कृतीचं समर्थन केलं आहे तर काहींनी या लग्नाची खिल्ली उडवली आहे. विशेष म्हणजे याच प्रांतात गेल्या काही दिवसांपूर्वी मोहम्मद जकारिया यांनीही दुसरं लग्न केलं. ते 95 वर्षांचे आहेत. त्यांनी उतारवयातील सोबतीसाठी दुसरं लग्न केल्याची माहिती मिळत आहे.