पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पुँछमध्ये गोळीबार

418
प्रातिनिधीक

जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जगभरातून कोणतंही समर्थन न मिळाल्याने आता पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. कश्मीरच्या पुँछ विभागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. या गोळीबाराला हिंदुस्थानी सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

गेल्या काही काळापासून पाकिस्तान संघर्ष विरामाचं वारंवार उल्लंघन करत आहे. पाकिस्तानातून कश्मीरमध्ये सातत्याने घुसखोरी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी गांदरबल इथे राबवलेल्या शोधमोहिमेत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. या दहशतवाद्याकडे हत्यारं सापडली होती. 28 सप्टेंबर रोजी देखील दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. त्यात अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं.

 

आपली प्रतिक्रिया द्या