कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत देण्यास पाकड्यांचा पुन्हा नकार

378

हेरगिरीच्या कथित आरोपाखाली पाकिस्तानच्या तुरुगांत असलेले हिंदुस्थानी नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकड्यांनी दुसऱ्यांदा दूतावासाची मदत देण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार करावा आणि त्यांना दूतावासाची मदत द्यावी असे आदेश पाकिस्तानला दिले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी जाधव यांना उच्चाधिकाऱ्यांची मदत देण्यात येईल असे टि्वटरवर जाहीर केले होते. नंतर हिंदुस्थानचे उप उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी जाधव यांची भेट घेतली होती. पण आता मात्र जाधव यांना दुसऱ्यांदा दूतावासाची मदत दिली जाणार नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते फैसल यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या