एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तान बिथरलेलाच, सीमेजवळ 300 रणगाडे तैनात

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

26 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थानी वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त केला होता. याची धकधक अजूनही पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानी सैन्याने आपल्या सीमेजवळ 300 रणगाडे तैनात ठेवले आहेत. शकरगढ भागात पाकिस्तानने हे रणगाडे तैनात केले असून सैन्याच्या काही तुकड्याही ठेवण्यात आल्या आहेत.

शकरगडमध्ये पाकिस्तानी सैन्याने एअरस्ट्राईक नंतर लष्कराच्या काही तुकड्या तैनात केल्या होत्या. काही दिवसांत या तुकड्या त्यांनी कमी केल्या होत्या. सध्या  124 आर्मर्ड ब्रिगेड, 125 आर्मर्ड ब्रिगेड, 8 आणि 15 डिवीजनचे सैन्य अजूनही इथे तैनात आहे. तसेच 300 रणगाडेही सैन्याने इथे तैनात केले आहे.

26 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक करून दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तान आणि हिंदुस्थानमध्ये तणावही वाढला होता.

आपली प्रतिक्रिया द्या