पाकिस्तानात सत्ताबदल अटळ

1193

महागाईमुळे पिचलेल्या जनतेचा रोष कायम असला तरी देशातील विरोधी पक्ष आणि लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचा पाकिस्तान सरकारला पाठिंबा होता. मात्र पंतप्रधान इम्रान खान आणि बाजवा यांच्यात तब्बल दोन महिन्यांनंतर नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर इम्रान यांनी अचानक दोन दिवसांच्या रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानात सत्ताबदल होण्याचे वारे वाहू लागले आहेत.

पाकिस्तानातील ‘जंग’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार इम्रान आणि बाजवा यांच्या बैठकीनंतर दोघांच्याही बॉडी लँग्वेजमध्ये खूप फरक जाणवला.

दोन महिन्यांत एकही बैठक नाही

लष्करप्रमुख बाजवा आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यात गेल्या दोन महिन्यांत एकही भेट झाली नव्हती. देश महागाईने त्रासलेला असताना आणि जनतेसोबत विरोधी पक्षही पंतप्रधानांचा राजीनामा मागत असतानाही या दोघांची एकदाही भेट झाली नव्हती. मात्र आता इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील ‘तहरीक-ए-इन्साफ’ पार्टीबाबत लष्करप्रमुख बाजवा यांचे बिनसल्याची चर्चा पाकिस्तानात सर्वत्र होऊ लागली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या