पाकिस्तानातील सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा; पाकच्या ज्येष्ठ पत्रकाराचा शरीफ यांना सल्ला

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने उचललेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. पाणी अडवल्यामुळे पाकिस्तानचा घसा कोरडा पडत आहे. तसेच त्यांच्या तिजोरीतही खडखडाट आहे. जगातील मोजके देशे कोणीही त्यांच्या मदतीसाठी येत नाही. आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानला आता पळता भुई थोडी झाली आहे. तसेच कोणत्याही क्षणी हिंदुस्थानी हल्ला करेल, या भीतीने पाकडे धास्तावले आहेत. त्यातच आता पाकिस्तानातील वरिष्ठ पत्रकार आणि शाहबाज शरीफ यांचे निकटवर्तीय नजम सेठी यांनी एक विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. तसेच पाकिस्तानचे पाय आणखी खोलात जात असल्याचे दिसून येते आहे. अमेरिकेवर असलेल्या हिंदुस्थानी प्रभाव कमी करण्यासाठी पाकिस्तानातील सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवण्याचा सल्ला त्यांनी शरीफ यांना दिला आहे.

हिंदुस्थानशी थेट पंगा घेण्याची किंवा युद्ध करण्याची पाकिस्तानची क्षमता नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हिंदुस्थानकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईबद्दल पाकिस्तानची चिंता वाढली आहे. कोणत्याक्षी क्षणी हिंदुस्थान अचानक हल्ला करू शकतो, अशी भीती पाकड्यांना वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तान कुरघोडी करत कुटील डाव आखत आहे. अमेरिका आणि चीनकडून पाठिंबा मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न करत आहे. मात्र, अमेरिकेकडून त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकारनजम सेठी यांनी शरीफ यांना एक सल्ला दिला आहे. त्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.

अमेरिकेवर असलेला हिंदुस्थानचा प्रभाव कमी करण्यासाठी पाकिस्तानातील सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवले पाहिजे. अमेरिकेतील हिंदुस्थानी लॉबीला मागे टाकायचे असेल तर आपल्याला पबमध्ये जाऊ शकणाऱ्या सुंदर पाकिस्तानी महिलांना तिथे पाठवावे लागेल. त्या तेथील थिंक टँकसोबत मिसळू शकतील. तसेच त्या महिलांच्या सौंदर्याने आणि ग्लॅमरने अमेरिकवर पाकिस्तानचा प्रभाव निर्माण होईल, असे सेठी यांनी म्हटले आहे.

सेठी यांच्या विधानावर सोशल मीडियावर वादाला सुरुवात झाली आहे. महिलांच्या प्रतिष्ठेविरुद्ध हे वक्तव्य आहे. अशी वक्तव्ये म्हणजे पाकिस्तानचे राजनैतिक अपयश आहे. तसेच युद्धाच्या धास्तीने राजकीय नेते महिलांना पुढे करत आहेत, अशी टीकाही सेठी यांच्यावर होत आहे. हे विधान केवळ महिलांचा अपमान करत नाही तर पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाच्या विचारसरणीलाही बदनाम करते. अशा वक्तत्वामुळे पाकिस्तानचा कमकुवतपणा जगासमोर येतो, असे अनेकांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकड्यांचे हसे झाले आहे.