Video : दहशतवादी हे पाकिस्तानचे हिरोच – परवेझ मुशर्रफ

1718

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी एका मुलाखतीत ‘दहशतवादी हे पाकिस्तानचे हिरोच’ असल्याची कबूली दिली आहे. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यांनी तालिबानचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला देखील हिरो म्हटले आहे. ही क्लिप जुनी असली तरी या क्लिपमधून पुन्हा एकदा पाकिस्तानचा नापाक चेहरा जगासमोर आला आहे.


पाकिस्तानातील नते फरहतुल्ला बाबर यांनी बुधवारी परवेझ मुशर्रफ यांच्या एका जुन्या मुलाखतीची व्हिडीओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. ‘जे कश्मीरी पाकिस्तानात आले त्यांचे आम्ही चांगल्या प्रकारे स्वागत केले. आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना मुजाहिद्दीन केले. त्यांना हिंदुस्थानी लष्करासोबत लढायला तयार केले. यादरम्यानच लष्कर-ए-तोयबा सारख्या वेगवेगळ्या संघटना उदयाला आल्या. ते सर्व आमचे हिरो आहेत’, असे या मुलाखतीत मुशर्रफ यांनी सांगितले आहे.

 

‘1979 ला आम्ही पाकिस्तानच्या फायद्यासाठी अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी पाठवले. त्यासाठी जगभरातून आलेल्या मुजाहिद्दींना आम्ही प्रशिक्षण दिलं. त्यांना शस्त्र पुरवली. तालिबानींना प्रशिक्षण दिलं. हक्कानीला प्रशिक्षण दिलं. हक्कानी, ओसामा बिन लादेन, अयमान अल झवाहिरी हे आमचे हिरो आहेत’, असे देखील मुशर्रफ यांनी या मुलाखतीत सांगितले.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या