
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीपर्यंत कुलभूषण जाधवांच्या सुनावणी स्थगित करावी अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. या मागणीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने केराची टोपली दाखवली आहे. जम्मू कश्मीरमधील पुलवामाध्ये जवानांच्या हल्ल्यानंतर हिंदुस्थान पाकिस्तान मध्ये तणाव निर्माण झाला होता. या तणावातच जाधव यांच्यावर चार दिवसीय सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू झाली होती.
The Hague (Netherlands): Pakistan’s Attorney General Anwar Mansoor Khan is submitting his arguments in Kulbhushan Jadhav’s case before International Court of Justice (ICJ) pic.twitter.com/i0tdEgZgtF
— ANI (@ANI) February 19, 2019
पाकिस्तानने मंगळवारी आपली बाजू मांडली. नंतर एडहॉक यांच्या आजारपणाचा हवाला देत पाकिस्तानने ही सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली होती.
आंतरराष्ट्रीय न्यायलायात पाकिस्तानचे न्यायाधीश तस्सदुक हुसैन जिलानी यांना सुनावणीच्या पहिल्या दिवशी हृदय विकाराचा झटका आला होता. पाकिस्तानची बाजू मांडणारे ऍटर्नी जनरल अन्वर मन्सूर खान यांनी सुनावणी दरम्यान म्हटले की, “आमचे अधिकार मिळवण्यासाठी एक चांगला न्यायाधीश नियुक्त करण्यासाठी न्यायालय आम्हाला हक्क बहाल करतात.” आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानची ही मागणी नाकारली असून पाकिस्तानच्या न्यायाधीशांच्या अनुपस्थित बाजू मांडण्यास सांगितले आहे.



























































