
दिल्लीतील प्रदूषणाबाबत उत्तर प्रदेश सरकारने अजब तर्कट मांडले आहे. गेल्या महिनाभरात दिल्लीतील वाढलेल्या हवेच्या प्रदूषणाला उत्तर प्रदेशमधील उद्योग जबाबदार नाहीत, तर तो पाकिस्तानातून येणाऱ्या प्रदूषित हवेचा परिणाम असल्याची भूमिका शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. त्यावर पाकिस्तानातील उद्योगांवर न्यायालयाने बंदी घालावी, अशी आपली इच्छा आहे का, असा सवाल मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमन्ना यांनी केला.


























































