हिंदुस्थानशी तणावादरम्यान पाकिस्तानला मिळाला मदतीचा हात, IMF ने दिले 8,400 कोटी रुपये

हिंदुस्थानशी तणावादरम्यान पाकिस्तानला पुन्हा एकदा आयएमएफकडून कर्ज मिळाले आहे. गेल्या आठवड्यातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते. यातच आता विस्तारित निधी सुविधा कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला 1.02 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 8,400 कोटी रुपये) दुसरा हप्ता देण्यात आला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने म्हटले आहे की, 16 मे रोजी संपणाऱ्या आठवड्यासाठी ही रक्कम देशाच्या परकीय चलन साठ्यात समाविष्ट केली जाईल.

हिंदुस्थानने यावर चिंता म्हटले होते की, पाकिस्तान या पैशाचा वापर सीमापार दहशतवादाला चालना देण्यासाठी करू शकतो. हिंदुस्थानने असेही म्हटले होते की, या आर्थिक मदतीमुळे पाकिस्तान मोठ्या कर्जात बुडाला आहे आणि तो आयएमएफचा मोठा कर्जदार बनला आहे.

दरम्याम, पाकिस्तान सध्या आर्थिक संकटातून जात आहे. देशाच्या परकीय चलन साठ्यातही सातत्याने घट होत आहे. याशिवाय येथे महागाईही गगनाला भिडत आहे. आयएमएफकडून मिळणारा निधी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला आधार देईल, परंतु दरम्यानच्या काळात हिंदुस्थानसोबत युद्धात पाकिस्तानचे खूप नुकसान झाले आहे.