पाकिस्तानात घुमतोय ‘मंदिर वही बनाओ’चा नारा, विरोधकांनी केली मागणी; जाणून घ्या काय आहे कारण

2685

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे विधिवत भूमिपूजन केले. यासह राम मंदिर निर्माणाच्या कार्याला सुरुवात झाली. अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होताच पाकिस्तानात विरोधी पक्षाने केलेल्या मागणीमुळे खळबळ उडाली आहे. येथे पाकिस्तान पीपुल्स पार्टी (पीपीपी) ने केलेल्या सत्ताधारी इम्रान खान यांच्या सरकार मोदींना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्लामाबादमध्ये श्रीकृष्ण मंदिर उभारण्याची मागणी केली आहे.

‘मोदी अयोध्येत राम मंदिर बनवत असून याला जशास तसे उत्तर देण्यासाठी इम्रान यांनी इस्लामाबादमध्ये श्रीकृष्ण मंदिर उभारावे’ अशी मागणी पीपीपी पक्षाच्या प्रवक्त्याने केली आहे. अर्थात यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. याआधी इस्लामाबादमध्ये 1 महिन्यांपूर्वी श्रीकृष्ण मंदिराचे निर्माण कार्य सुरू करण्यात आले होते, मात्र कट्टर पंथी लोकांच्या दबावामुळे हे काम थांबण्यात आले होते. याच मंदिराचे काम पुन्हा सुरू करण्याची मागणी पीपीपीने केली आहे.

पीपीपीचे खासदार मुस्तफा नवाज खोखर यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढत मोदींना ठोस उत्तर देण्याची मागणी केली. यासाठी इम्रान सरकारने तात्काळ पावलं उचलावी आणि राजधानी इस्लामाबादमध्ये मंदिर उभारणीत जे अडथळे येत आहेत ते दूर करावे. येथे मंदिर उभारणी करून पाकिस्तान सर्व धर्मियांचा आदर करतो हे जगाला दाखवून देऊ, असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

मंदिराचे बांधकाम पाडले
इस्लामाबादमध्ये श्रीकृष्ण मंदिर उभारण्याचा प्रस्ताव इम्रान सरकारने मान्य केला होता आणि जमीनही दिली होती. दोन महिन्यांपूर्वी या कामास सुरुवात झाली. मात्र कट्टरपंथी लोकांनी या मंदिराचे बांधकाम उखडून टाकले. पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र असून येथे आम्ही कर भरतो. आमच्या पैशातून मंदिर उभारू देणार नाही, असे कट्टरपंथी लोकांचे म्हणणे असून याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असून याचिका दाखल करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या