अमेरिकेने मदत रद्द केलेली नाही! पाकड्यांच्या उलट्या बोंबा

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

अमेरिकेने पाकिस्तानची 300 मिलियन डॉलरची (2130 कोटी रुपये) आर्थिक मदत रद्द केली आहे. मात्र, अमेरिकेने पाकिस्तानची कोणतीही आर्थिक मदत रद्द केलेली नाही, तर आमचे देणे होते. त्यातील ही रक्कम असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या या दाव्यावरून त्यांच्या उलट्या बोंबा सुरूच असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेच्या कोएलेशन सपोर्ट फंडमध्ये पाकिस्तानचाही हिस्सा आहे. दहशतवादविरोधातील लढ्यासाठी आम्ही तो खर्च केला आहे. अमेरिका जी मदत देत आहे, ती मदत नसून आम्ही आधी खर्च केलेली रक्कम असल्याचा दावा पाकिस्तानचे परदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केला आहे.

पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. गेल्या १७ वर्षांपासून अमेरिका अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांविरोधात लढत आहे. मात्र, पाकिस्तान त्या दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याने अमेरिकेला मोहिमेत अपेक्षित यश मिळाले नाही. पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत रद्द करत असल्याची घोषणा शनिवारी केली होती.

याआधीही अमेरिकेने पाकिस्तानची ५०० मिलियन डॉलरची (सुमारे ५६८० कोटी रुपये) मदत रद्द केली होती. अमेरिकेने नुकत्याच रद्द केलेल्या आर्थिक मदतीबाबत पाकिस्तानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या या उलट्या बोंबांनंतर आता अमेरिका नेमकी काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. पाकिस्तानच्या या दाव्यामुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.