
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता त्याची संपत्ती जप्त करण्यात येणार असल्याचे समजते. मसूद अजहरची सर्व बँकांतील खाती सील करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान सरकारकडून त्यासाठी ठोस पाऊले उचचली जाणार आहेत.
मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता पाकिस्तानच्या सिक्युरिची आणि एक्सचेंज कमिशनने गुरुवारी बँकांना मसून अजहरची खात्यांवर जप्ती आणण्याचे आदेश दिले असल्याचे समजते. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच मसूदचे नाव पाकिस्तानातील नॅशनल अँटी टेररिस्ट ऑथरिटीच्या यादीत देखील सामील केले जाणार आहे. त्यामुळे मसूदच्या पाकिस्तान बाहेर प्रवासावर देखील बंदी येणार आहे.




























































