Breaking – चंदीगडमध्ये सायरन वाजलं; हवाई तळावर हल्ल्याच्या शक्यतेने सुरक्षा दल सतर्क

 

हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुरुवारी पाकिस्तानने जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब राज्यातील विविध भागात ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमानाद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण हिंदुस्थानने त्यांच्या हा डाव हाणून पाडला आहे. मात्र तरी देखील पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच आहेत. पाकिस्तान आता चंदीगडच्या हवाई तळावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे चंदीगडमध्ये सायरन वाजवण्यास सुरूवात झाली आहे.

हिंदुस्थानने पाकिस्तानचे सगळे डाव धुडकावून पाकिस्तानची चांगलीच जिरवली. मात्र तरीही पाकिस्तानने शुक्रवार पहाटे 4 वाजचा पंजाबवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हाही हिंदुस्थाने चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान आता पाकिस्तान चंडीगडच्या एअरफोर्स स्टेशनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले असून त्यांनी संपूर्ण चंदीगडमध्ये सायरन वाजवण्यास सुरूवात केली आहे. तसेत प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्याचे तसेच घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.