कश्मीर खोऱ्य़ात, सीमेवर पाकड्यांचे हल्ले सुरूच, लष्करी अधिकारी, जवान शहीद

651

सीमेवर पाकड्यांकडून हल्ले सुरूच आहेत. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचा एक अधिकारी शहीद झाला. तसेच कुपवाडा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात जवान सौरभ कटारा यांना वीरमरण आले. दरम्यान, हिंदुस्थानी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पाक सैन्याची एक चौकी उद्ध्वस्त झाली. त्यात पाकचे पाच सैनिक जखमी झाले आहेत.

प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर रामपूर आणि उरी सेक्टरमध्ये पाकडय़ांनी गोळीबार करीत तोफगोळ्यांचा मारा केला. हिंदुस्थानी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या धुमश्चक्रीत हिंदुस्थानी लष्कराचे एक ज्युनिअर कमिशण्ड ऑफिसर शहीद झाल्याचे वृत्त आहे. पाकडय़ांनी सीमेलगतच्या गावांनाही टार्गेट केले. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला.

लग्नानंतर अवघ्या 16 व्या दिवशी सौरभ कटारा शहीद
भरतपूरजवळील बरौली ब्राह्मणगावचे सुपुत्र असलेले 25 वर्षीय सौरभ कटारा यांचा विवाह 8 डिसेंबर रोजी झाला होता. विवाहानंतर अवघ्या सोळा दिवसांत सौरभ यांना वीरमरण आले. जवान सौरभ हे लष्करात चालक होते. सुट्टी संपवून पाच दिवसांपूर्वीच ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते. सौरभ शहीद झाल्याच्या वृत्ताने कटारा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनाही प्रचंड धक्का बसला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी शोक व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या