दहशतवाद थांबवला नाही तर पाकिस्तानचे तुकडे!

1248

पाकिस्तानने दहशतवाद पसरवणे आणि दहशतवादाला खतपाणी देणे थांबवले नाही तर पाकिस्तानचे तुकडे होतील, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राजनाथ म्हणाले, ‘पाकिस्तान एकीकडे शांततेची चर्चा करत असल्याचा कांगावा करतो तर दुसरीकडे दहशतवादाला खतपाणी घालतो. अशा प्रकारे चर्चा शक्य नाही. आता फक्त पाकिस्तानव्याप्त कश्मीर आणि दहशतवाद संपवण्यासाठी काय पावले उचलणे शक्य आहे, यावरच चर्चा शक्य आहे.’ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका सभेत ‘मी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत सैनिकांनी सीमा पार करू नये,’ अशी पोकळ वल्गना केली होती. त्याला राजनाथ सिंह यांनी सडेतोड उत्तर दिले.

आपली प्रतिक्रिया द्या