पाकिस्तानी वृत्त निवेदिका म्हणते ऍपल कंपनी सफरचंद विकते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पाकिस्तानी पत्रकार नेहमीच आपल्या विनोदी वर्तानामुळे नेहमीच चर्चेत असतात. मग तो चांद नवाब असो वा तौबा तौबा करणारा पत्रकार असो. यामध्ये आता एका महिला निवेदकाची भर पडली आहे. बाईंनी अमेरिकेच्या ऍपल कंपनीला सफरचंद विकणारी कंपनी समजली आहे.

एका कार्यक्रमादरम्यान एक तज्ज्ञ विश्लेषणादरम्यान म्हणाला की, ऍपल कंपनीची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा खूप मोठी आहे. तेव्हा निवेदिकेने ही संफरचंदाची कंपनी असल्याचा जावई शोध लावला. यावर तज्ज्ञही थोडा वेळ गोंधळला आणि ही कंपनी मोबाईलची असून खाण्याच्या सफरचंदाची नसल्याचे तिला सांगितले.