पालघर जिल्ह्यातही हवेतून ऑक्सिजन निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी जव्हार, पालघर व डहाणू येथील आरोग्य सुविधा केंद्रांवर प्रत्येकी सवा टन ऑक्सिजनची लवकरच निर्मिती होणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली. कोरोनाच्या संकटात जाणवणाऱया ऑक्सिजनच्या तुटवडय़ावर मार्ग काढण्यासाठी हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार 3 कोटी 20 लाखांच्या प्रशासकीय मंजुऱया जिल्हा विकास योजनेतून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी पालघर व जव्हार येथे तत्काळ काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले असून उर्वरित प्रकल्प लवकरच पूर्ण होतील.