कॉलेजमध्ये असताना माझ्यावर सामूहिक बलात्कार झालेला, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

6997

गेल्या काही वर्षात अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली आहे. अनेकींसोबत चित्रपटाच्या सेटवर, घरात, नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार झाले आहेत. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री पमेला अँडरसनने देखील तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले आहे. पमेलाने काही वर्षांपूर्वी हिंदुस्थान दौऱ्याच्यावेळी तिच्यासोबत एक घडलेला हा धक्कादायक प्रकार सांगितलेला.

pamela-anderson-big-boss-1

मी 12 वर्षांची असताना माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेली होती. त्यावेळी माझी मैत्रिण, तिचा बॉयफ्रेंड व त्याचा मोठा भाऊ देखील होता. त्या भावाने मला बोर्ड गेम शिकवायच्या बहाण्याने माझ्यावर बलात्कार केला. त्यावेळी मला काही समजत नव्हतं काय करावं ते. मी खूप घाबरलेले. त्यानंतर मी कॉलेजला गेले तेव्हा माझ्या बॉयफ्रेंडने व त्याच्या सहा मित्रांनी माझ्यावर बलात्कार केलेला. त्यावेळी जीव द्यावासा वाट होता. मात्र घरच्यांच्या साथीने मी या भयंकर प्रकारातून बाहेर पडले, असे पमेलाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या