
प्रसिद्ध अभिनेत्री पमेला अँडरसन हिने काही दिवसांपूर्वीच निर्माते जॉन पीटर्ससोबत लग्न केले होते. पमेलाचे ते पाचवे लग्न होते. मात्र हे लग्न अवघे काही दिवसच टिकले असून दोन आठवड्यात हे दाम्पत्य एकमेकांपासून वेगळे झाले आहे.

‘मी व पीटरने एकत्र बसून हा निर्णय घेतला आहे. मी आता या नात्यातून बाहेर पडले आहे. आम्हाला एकत्र राहताना काही थोडं विचित्रं वाटत होतं. त्यामुळे आता आम्ही या नात्याला थोडा वेळ देऊ इच्छितो. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की आम्हाला या नात्याकडून व एकमेकांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत. त्यामुळे आम्ही या लग्नाच्या बंधनातून मुक्त होत असून एकमेकांसोबतचे विश्वासाचे नाते कायम ठेवत आहोत’, असे पमेलाने सांगितले.
52 वर्षीय पमेलाचे हे पाचवे लग्न होते. पमेलाचे पहिले लग्न हे अमेरिकन संगीतकार टॉमी याच्यासोबत झालेले. मात्र तीन वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने किड रॉकी या अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधली. रॉकीसोबत वेगळं झाल्यानंतर चित्रपट निर्माते रिक सोलोमन तिच्या आयुष्यात आले. त्यांच्यासोबत वर्षभर संसार घेतल्यानंतर त्या दोघांनीही काडिमोड घेतला. जवळपास पाच वर्ष वेगळे राहिल्यानंतर पुन्हा तिने सोलोमनसोबतच लग्न केले. मात्र यावेळेसही हे लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर काही काळ ती फ्रेंच सॉकर खेळाडू आदिल रामी याच्या प्रेमात पडली होती. त्याच्यासाठी ती फ्रान्सला स्थायिक झालेली. मात्र हे प्रेमसंबंध देखील फार काळ टिकले नाही. त्यानंतर मेलाने चित्रपट निर्माते जॉन पीटर्ससोबत लग्न केले होते.


























































