पॅन-आधार लिंक 31 डिसेंबरपर्यंत अनिवार्य

478

पॅन कार्ड आणि आधार कार्ड येत्या 31 डिसेंबरपर्यंत एकमेकांना लिंक करणे अनिवार्य आहे, असे आयकर विभागाने आज जाहीर केले. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने सप्टेंबरमध्येच यासंदर्भातील मुदत वाढवून 31 डिसेंबर केली होती. तत्पूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत होती. आयकर कायद्यानुसार ज्या नागरिकाकडे 1 जुलै 2017 पर्यंत पॅनकार्ड आहे आणि तो आधारकार्ड मिळवण्यास पात्र आहे त्याने आपला आधार क्रमांक आयकर खात्याला दिला पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या