पॅनला आधारशी जोडण्याची मुदत सरकारने आणखीन वाढविली; जाणून घ्या शेवटची तारीख

509

देशात कोरोनाच्या रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन पॅनकार्डला आधार कार्डशी जोडण्याची मुदत सरकारने वाढविली आहे. प्राप्तिकर विभागाने याबाबतची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आता 31 मार्च 2021 पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वीही ही तारीख बर्‍याच वेळा वाढविण्यात आली आहे. यावेळी कोरोना संकट लक्षात घेऊन ही मुदत वाढविण्यात आली आहे. पूर्वी ही अंतिम मुदत 30 जून 2020 होती.

आधार क्रमांक पॅनकार्डशी जोडला नाही तर?

आधार क्रमांक पॅनकार्डशी जोडला गेला नाही तर तुमचे पॅनकार्ड अवैध मानले जाईल. बँकेतील व्यवहारांसाठी आणि बँकेत खाते उघडण्यासाठीही पॅनकार्ड लागते. त्यामुळे तुमच्या बँकेतील सर्व व्यवहार ठप्प होण्याची भीती.

पॅनकार्डशी असा जोडा आधार क्रमांक

  • वेबसाइटवर तुमचे खाते उघडा.
  • तुमचे प्रोफाईल तयार करा.
  • त्यानंतर आधार लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल.
  • अर्जात पॅनकार्डवर दाखवल्याप्रमाणे तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग इत्यादी माहिती भरा.
  • पुढे तुमचा आधार क्रमांक आणि नाव भरा.
  • त्यानंतर लगेचच तुमचा आधार क्रमांक पॅनकार्डशी जोडला गेल्याचा खात्रीलायक मेसेज ई-मेलद्वारे तुम्हाला येईल.
  • आधारकार्ड सक्तीचे
  • मोबाईल क्रमांक आधारकार्डशी जोडणेही बंधनकारक.
  • विविध सरकारी सेवांसाठी आधारकार्ड सक्तीचे.

आपली प्रतिक्रिया द्या