
कोरोनाचे संकट पाहता पोलीस डोळ्यांत तेल घालून काम करत आहेत. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. पण काही लोकांनी पान मसाला विकण्यासाठी ड्रोनचा वापर केला आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
गुजरातच्या मोरबी भागात एकाने पान मसाला ड्रोनच्या माध्यमातून विकला आहे. त्याचा व्हिडीओही टिक टोकवर टाकला होता. पोलिसांच्या निदर्शनास ही बाब कळाल्यानंतर दोघांना अटक केली आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
























































