102 वर्षांच्या आजोबांनी कोरोनाला केले चारीमुंड्या चीत, गावकऱ्यांनी फुलांच्या पायघड्या टाकून केले स्वागत

कोरोनाची लागण झाली म्हणजे मृत्यू अटळ असा एक गैरसमज जनमाणसात पसरला गेल्याने, अनेक रुग्ण केवळ भीतीनेच दगावत आहेत. हे विदारक चित्र एकीकडे वाढीस लागत असताना 102 वय वर्षे असलेल्या आजोबांनी कोरोनाला चारीमुंड्या चीत करुन त्यावर सहज विजय प्राप्त केल्याची दिलासादायक बातमी पंढरपूर तालुक्यातून आली आहे. चांगदेव सोपान गाजरे (वय – 102, रा. शेळवे) असं या शतकवीराचे नाव आहे. भल्याभल्याला अचंबित करणारी किमया गाजरे आजोबांनी आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर करुन दाखविली आहे.

शेतकरी असलेल्या गाजरे यांच्या कुटुंबातील नातू आणि सूनबाईही कोरोना बाधित झाले होते. या सर्वांवर पंढरपूरमध्ये उपचार करण्यात आले. कोरोनाची लागण झाल्याने अनेक तरुण आपला जीव गमावत असताना 102 वर्षांचे आजोबा कोरोनावर मात करतील का याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र गाजरे आजोबांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत कोरोनाला चारीमुंड्या चीत केले. कोरोना संसर्ग सारख्या जीवघेण्या साथीचे आजार यापूर्वी येऊन गेले अन त्याचा मुकाबला तितक्याच ताकतीने केला गेला.

save_20200913_152907

कोरोनाची लागण लाखो लोकांना झाली मात्र त्यावर मात करुन बहुतांश रुग्ण बरे होत आहेत. या आजारात मृत्यूचा दर खूपच कमी आहे परंतू कोरोनामुळे मृत्यू होतोच अशी भीती निर्माण झाल्याने अनेकजण दगावले आहेत. खास करुन 50 वर्षांनंतरच्या व्यक्तींनी अधिक सगज राहावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत.

कोरोना रोगाविषयी अशा प्रकारची भीती पसरत असताना 102 वर्षांच्या गाजरे आजोबांनी केलेली कोरोनावरील मात समाजाला दिलासा देणारी आहे. या आनंदातूनच गावकऱ्यांनी आजोबांचे फुलांच्या पायघड्या टाकून स्वागत केले.

आपली प्रतिक्रिया द्या