व्हिडीओ: पंढरपुरात धनगर आरक्षणासाठी मुंडण आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पंढरपूर

मराठा समाजापाठोपाठ आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला असून आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रभागेत मुंडण आंदोलन केलं आहे. राज्यभरात मराठा आंदोलनाने पोलीस प्रशासनाची दमछाक उडालेली असताना आता धनगर समाजानेही आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलीस देखील तणावात आहेत.


धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी धनगर समाजाच्या वतीने चंद्रभागा नदीपात्रात सरकारचा दशक्रिया विधी करून मुंडण करीत आंदोलन केलं आहे. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.