
आज चैत्र शुध्द रामनवमीचे औचित्य साधून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने देवाच्या गाभाऱ्यात सफरचंदाची मनमोहक आरास केली आहे.

लालेलाल रंगाचे हे कश्मिरी सफरचंद देवाचा गाभारा, सोळखांबी आदी दर्शनी भागात लावले असल्याने सावळा विठुराया जणू काही सफरचंदाच्या बागेत उभा आहे की काय असा भास होतो.

पुण्यातील श्री विठ्ठल भक्त भरत रामचंद्र यादव यांनी श्री विठ्ठल चरणी पाच हजार सफरचंद अर्पण केली आहेत, त्यातून ही आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे.


























































