पंढरीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त, मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते सील, बस सेवा 2 दिवस राहणार बंद

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर उघडण्याचे आंदोलन मागे घेण्यास वंचित आघाडी व वारकरी संघटनांनी नकार दिल्यामुळे प्रशासनाने हे बेकायदेशीर आंदोलन मोडून काढण्यासाठी जय्यत केली आहे. 31 ऑगस्ट रोजी 1 लाख वारकऱ्यांना सोबत घेऊन मंदिर प्रवेश करणार असल्याची घोषणा वंचितचे बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंदिराकडे जाणारे शहरातील सर्व रस्ते बैरिकेट्स लावून बंद केले आहेत. 400 पोलीस आणि 50 अधिकाऱ्यांचा अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याशिवाय दक्षता म्हणून सोलापूर जिल्ह्यातील एसटी बस सेवा दोन दिवस बंद करण्यात आली आहे.

save_20200830_194441

दरम्यान सदर आंदोलनाच्या पार्श्‍वभूमिवर मंदिर परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. मंदिराकडे येणार्‍या सर्व लहान मोठ्या बोळाच्या तोंडाशी दहा फूट लोखंडी बॅरेगेटींग लावण्यात आले आहेत. तसेच चौफाला व महाव्दार चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. शहरात येणार्‍या प्रमुख मार्गावर देखील बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांची जादा कुमक यासाठी शहरात दाखल झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या