पंढरपूर-मंगळवेढय़ातून भारत भालके यांची हॅट्ट्रिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके हे 14 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. भालके यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. भाजपचे उमेदवार, ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव झाला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. वास्तविक हा मतदारसंघ सेनेच्या वाटय़ाला आलेला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हा मतदारसंघ काढून रयत क्रांतीला उमेदवारी दिली होती. परिचारक यांना सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, भालके यांनी सामान्य जनतेच्या जोरावर हा विजय खेचून आणला.