सामना प्रतिनिधी। पंढरपूर
चंद्रभागेत आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडुन मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बुधवारी सकाळी घडली. राहुल रविंद्र काथार असे मृत तरुणाचे नाव आहे. राहुल व त्याचे तीन मित्र आंघोळीसाठी नदीत उतरले होते. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सर्वजण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी राहुल पाण्यात बुडाला पण त्याच्या इतर मित्रांना वाचवण्यात आले आहे. हे सर्वजण जळगावचे रहीवासी आहेत. चंद्रभागेत बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची ही आठ दिवसातली दुसरी घटना आहे
भरत काथार, नितीन कुबर, राजेंद्र सोनार अशी या वाचवलेल्या तिघांची नावे आहेत. यातील भरत हा राहुलचा सख्खा भाऊ आहे.
उजनी धरणातून चंद्रभागा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असून तिची पातळीही वाढली आहे. नदीजवळील मंदिरेही पाण्याखाली गेली आहेत.
दरम्यान, चंद्रभागेची पाण्याची पातळी वाढलेली असतानाही काही उत्साही भाविक आंघोळीसाठी नदीत उतरतं आहेत. या तरुणांना आवरणे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरले आहे. चंद्रभागेत बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची ही आठ दिवसातली दुसरी घटना आहे. याआधी कर्नाटकच्या बसवकल्याण जिल्हयातील लखन टोंपे या तरूणाचा बुडून मृत्यू झाला तर मुंढेवाडीत एक जण नदीत बुडून मृत्यू झाला.
नदीतील पाणीपातळी वाढल्याने प्रशासनाकडून भाविकाना काळजी घेण्याच आवाहन केल जात आहे.
summary-pandhrpur-one-boy-drawn-in-chandrabhaga-river

























































