डॉ. पंडित केशव गिंडेंचा भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक डॉ. पंडित केशव गिंडे यांना 10 जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, पुणे येथे सायंकाळी 6.30 वाजता प्रदान केला जाणार आहे. पाच लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ गायक पंडित नाथ नेरळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. पुरस्कार प्रदान समारंभाला जोडून पं. भीमसेन जोशी स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सवाचे 10 ते 12 जानेवारीला होणार आहे. 10 जानेवारी रोजी जलतरंग वादक पं मिलिंद तुळणकर आणि पंडित केशव गिंडे यांचा बासरी वादनाचा कार्यक्रम सादर होईल. 11 जानेवारी रोजी भीमसेन जोशी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीप्राप्त कलाकार सुजित-अजित लोहार यांचा पखकाज व तबला वादनाचा, स्वप्ना दातार यांचा व्हायोलिन वादनाचा स्वरस्वप्न तर पं.गोविद भिलारे यांचा मृदुंग वादनाचा कार्यक्रम सादर होईल.