पाण्याच्या शोधात खवल्या मांजराचे मानवी वस्तीत आगमन

सामना ऑनलाईन । लातूर

लातूर जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट अधिक गडद होत आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना आता पाण्याच्या शोधात वन्यजीव देखील मानवी वस्तीकडे येत आहेत. रेणापूर तालुक्यातील खलंग्री-माकेगावच्या शिवारात पाण्याच्या शोधात आलेले एक दुर्मिळ खवल्या मांजर आढळले आहे.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खलंग्री-माकेगावात ग्रामस्थांनी खवल्या मांजराला बघताच त्यांच्यामध्ये प्रचंड कुतुहल निर्माण झाले. अनेकांना हा प्राणी नेमका कोणता आहे माहिती नव्हती. मात्र प्राणी मित्रांनी हे खवलेमांजर असल्याचे सांगितले. तहानेमुळे व्याकुळ होऊन हे मांजर पाण्याच्या शोधात गावात आले असल्याची शक्यता प्राणी मित्रांने व्यक्त केल्येने ग्रामस्थांनी त्याला पाणी पाजलले. तसेच याबाबतची माहिती त्यांनी वन विभागाला दिली. तापमान वाढल्यामुळे अनेक ठिकाणचे पाणवठे आटल्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.