जयदत्त क्षीरसागरांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडेंच्या सभांचा धडाका

2129

जयदत्त क्षीरसागर व स्व. गोपीनाथ मुंडे यांचे आतापर्यंत एकमेकांचे राजकीय मार्ग वेगळे असले तरी अडचणीच्या काळात एकमेकांसाठी धावून जाण्याची परंपरा आधी पासूनच होती, लोकसभा निवडणुकीच्या वेळी  राष्ट्रवादीमध्ये असतानाही जयदत्त क्षीरसागर यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासाठी प्रचार केला होता. त्याची परत फेड करण्यासाठी आता जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी पंकजा मुंडे मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या प्रचार सभांचा धडाका  सुरू होणार असून पहिली सभा उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता रायमोहा येथे होत आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

क्षीरसागर आणि मुंडे या दोन कुटुंबाचा जिव्हाळा आणी सलोखा वर्षानुवर्षं कायम आहे. राजकीय विचारधारा वेगवेगळी असताना ही या दोन कुटुंबानी एकमेकांच्या हिताचा विचार नेहमीच केला आहे. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्या विजयासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी मध्ये असताना प्रचंड मेळावा घेऊन प्रीतम मुंडे यांना पाठींबा जाहीर केला. केवळ पाठिंबाच दिला नाही तर 21 दिवस अहोरात्र परिश्रम घेतले जिल्हाभरातील कार्यकर्ते कामाला लावले. बीड विधानसभा मतदार संघात गावागावात जाऊन प्रीतम मुंडे यांच्यासाठी सभा घेतल्या. त्या निवडणूकीत प्रीतम मुंडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यानंतर क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या विधानसभा निवडणूकीत ते बीड मधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून लढत आहेत. या युद्धात क्षीरसागरांच्या मदतीसाठी आता पंकजा मुंडे मैदानात उतरत आहेत. त्यांची पहिली सभा उद्या रायमोहा येथे सकाळी 10 वाजता होत आहे, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे. पंकजा मुंडेंच्या सभा म्हणजे जयदत्त क्षीरसागरांच्या मताधिक्यात वाढ हे समीकरण जुळणार आहे हे नक्की. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,सुधाकर मिसाळ, वैजनाथ मिसाळ, वैजनाथ तांदळे, रामराव खेडकर यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या