पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

13332

पंकजा मुंडे यांनी फेसबूक आणि ट्विटरद्वारे केलेले स्टेटमेंट हे गोपिनाथगडावर जो गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित सोहळ्याच्या अनुषंगाने होते. दरवर्षी हा सोहळा होतो आणि त्यानिमित्ताने ती पोस्ट होती. या सोहळ्यात ते आपल्या पाठिराख्यांना मार्गदर्शन करतात आणि पुढील कार्यरचना ठरवतात. परंतु त्यांच्या स्टेटमेंटचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे, असे राम शिंदे पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, गोपिनाथ मुंडे यांनी भाजपला महाराष्ट्रातील टोकाटोकापर्यंत पोहोचवले असून पंकजा त्यांच्या कन्या आहेत. त्यांच्या मागे मोठा जनसमूदाय आहे. त्यांना व्यथित करण्याचे षडयंत्र रचले गेले असून योग्य वेळी कदाचित 12 तारेखला त्या आपली भूमिका जाहीर करतील. तसेच त्यांच्या-आमच्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे. अर्थाचा अनर्थ केल्याने त्या व्यथित झाल्या आहेत, असेही शिंदे म्हणाले.

पंकजा मुंडे यांच्या भेटीला भाजप नेत्यांची रीघ, ‘रॉयलस्टोन’वर खलबतं

परळी या भाजपच्या पारंपरिक मतदारसंघातून पराभव झाल्याने आणि पक्षानेच आपला गेम केला असा समज झाल्याने काहीशा नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टनंतर ट्विटर हॅण्डलवरून भाजपची ओळख हटवली. यामुळे भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली असून त्यांच्या मनधरणीसाठी राज्यातील नेत्यांनी धावाधाव सुरू केली आहे. मंगळवारी माजी मंत्री बबणराव लोणीकर यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. बबणराव लोणीकर यांच्यानंतर माजी शिक्षक मंत्री विनोद तावडे आणि माजी मंत्री राम शिंदे देखील पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले.

आपली प्रतिक्रिया द्या