
सध्या महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषा वाद उफाळून आला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ रोज व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही अशी मुजोरी परप्रांतियांकडून केली जात आहे. यावर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान आता अभिनेत्री काजोलचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काजोल मराठीतून माध्यमांशी बोलत असताना तिला हिंदी बोलण्याता आग्रह केला, तेव्हा तिने हिंदी बोलण्यास नकार दिला आहे. यामुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.
लता मंगेशकर पुरस्कारांसह 60 आणि 61वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यावेळी 2024चा राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल हिला मिळाला. हा पुरस्कार घेतल्यानंतर काजोलने माध्यमांशी मराठीतून संवाद साधला. यावेळी तिला काही पत्रकारांनी हिंदीतून बोलण्याचा आग्रह केला. तेव्हा ती खूप चिडली. आता मी हिंदीतून बोलू…, ज्यांना समजायचे असेल ते समजून घेतील; असं सडेतोड उत्तर तिने माध्यमांना दिलं.
काजोलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी काही चाहत्यांनी तिच्या या वागण्याचं समर्थन केलंय तर काहींनी तिला प्रचंड ट्रोल केलंय. हिंदी बोलायचं नसेल तर मराठीतूनच चित्रपट बनवा, असं एका युजरने म्हटले आहे. तर हिंदी भाषिक लोकांनी तुम्हाला स्टार बनवलं आहे हे विसरू नका, असे दुसऱ्या युजरने म्हटले आहे.