पराग जैन ‘रॉ’चे प्रमुख

केंद्र सरकारने पंजाब केडरचे आयपीएस पराग जैन यांची देशाच्या गुप्तचर संस्था असणाऱ्या ‘रॉ’चे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. ते 30 जून रोजी निवृत्त होत असलेल्या रवी सिन्हा यांची जागा घेतील. पराग जैन हे बऱ्याच काळापासून ‘रॉ’शी संबंधित आहेत. त्यांनी माजी प्रमुख सामंत गोयल यांच्यासोबत काम केले आहे. ते पाकिस्तान डेस्क हाताळत आहेत. त्यांनी कलम 370 हटवणे आणि बालाकोट हवाई हल्ला यासारख्या महत्त्वाच्या मोहिमांवर काम केले आहे.