खात्याचे चलन स्टॅम्प असल्यासच स्वीकारणार…एसबीआय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
10 एप्रिल 2019 पासून आतापर्यंत व्याजदरात 0.15 टक्क्यांनी कपात झाली आहे

सामना प्रतिनिधी। परळी वैद्यनाथ

शहरातल्या भारतीय स्टेट बँकेच्या टॉवर शाखेत अजबच फतवा काढण्यात आल्याचे दिसून येत आहे.चालू खाते,सी.सी.खाते या खात्यांवर रोकड जमा करण्यासाठी लागणारे चलन हाताने न लिहीता चलनावर वेगवेगळे शिक्के मारून ते विवरण भरून देण्यात यावे अशी अजब सूचना बँकेने केली आहे. यामुळे खातेदारक हैराण झाले आहेत.

शहरात टॉवर परिसरात असलेल्या स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत चालू खाते आणि सी.सी.खात्यात रक्कम जमा करण्यासाठी व्यापारी जातात.पैसे भरण्यासाठी चलनावर खातेदाराची माहितीही भरावी लागते जसे की दिनांक,खात्याचे नाव,खाते क्र.,रक्कम अक्षरी आणि अंकात,मोबाईल क्र.आणि खातेदाराची सही याप्रमाणे ती माहिती भरावी लागते. यामध्ये खात्याचे नाव आणि क्रमांक यांचे शिक्के काही खातेदारांकडे असतात. मात्र ते सर्वांनाच करणे शक्य होत नाही. चलनावरील विवरण हाताने भरणे स्टॅम्प पेक्षा अधिक सोपे आणि परवडणारे आहे. स्टॅम्प साठीचा अतिरिक्त खर्च आणि स्टँप बरोबर न उमटल्यास याचा त्रास पुन्हा खातेदारांनाच होणार आहे. एकंदरीतच बँकेकडून चालू खाते आणि सी.सी.खातेदारांना विनाकारण त्रास देत असल्याची चर्चा खातेदारांकडून होत आहे. याकडे वेळेतच वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणीही खातेदारांकडून केली गेली आहे.