
कोटय़वधी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह अन्य पाच पोलीस अधिकारी व अन्य दोघांविरोधात दाखल असलेल्या गुह्याचा तपास मुंबई पोलिसांकडून राज्य गुन्हे अन्वेषण विभागा (सीआयडी)कडे सोपिवण्यात आला आहे.
बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी केलेल्या तक्रारीनंतर परमबीर सिंह व अन्य पाच अधिकाऱयांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात कोटय़वधी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या गुह्यातील दोन आरोपी संजय पुनामिया आणि सुनिल जैन यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, या गुह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. मात्र हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.




























































