गाळात पाय फसला, मित्रांनी हात देऊनही नाही वाचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
adity-pimoplkar

सामना प्रतिनिधी । चारठाणा

जिंतूर तालुक्यातील चारठाणा या गावापासून मौजे ११ कि.मी. अंतरावर असलेल्या मौजे जामखुर्द (पो.चारठाणा) येथील आदित्य विलास पिंपळकर (१०) हा मुलगा व त्याचे तीन मित्र सोबत ढगे बुवा यांच्या पिराच्या दर्शनसाठी गेला होते. घराकडे परतीच्यावेळी मयत मुलगा व त्यांचा मित्राच्या चार जण सोबत गावालगत असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या योजनेंतर्गत गाव तलावात पोहताना अचानक खोल पाण्यात गेल्या गेले. विलास हा गळात फसला व त्याच्या नका, तोंडात पाणी यास वाचवण्यासाठी सोबत असलेला साई नागनाथ राठोड यांनी खूप प्रयत्न केला पण आदित्य पिंपळकर याच्या तोंडात नाकात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. इतर मुले मात्र सुखरुप पोहचले.

त्या मुलांनी गावातील ग्रामस्थाना सांगितले आसता गावातील ऊद्धव शेषराव पिंपळकर व नागरिकांनी त्या तलावाकडे धाव घेऊन आदित्यला पाण्याच्या बाहेर काढण्यात आल्यानंतर त्या मुलाला पाहिले असता तो मृत्यू पावल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती कळताच चारठाणा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर घोळवे यांनी व कर्मचारी पंचनामा करुण शव जिंतूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल आय.ऐ.ईनामदार व डि.डी.बूकरे हे करत आहे.