परभणीत आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, कोरोनाग्रस्तांची संख्या 22 वर

522
corona-virus-new-lates

परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवार, 22 मे रोजी रात्री परभणी शहरातील जुना पेडगाव रोड भागातील येथील एक व जिंतूर तालुक्यातील सावंगी (भांबळे) येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात शुक्रवार, 22 मे रोजी मध्यरात्री प्राप्त अहवालानुसार आणखी नव्याने दोन रुग्ण आढळून आले. आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ वर पोहचली आहे. त्यात परभणी येथील जुना पेडगाव रोड भागातील एक व जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथील एका रूग्णाचा समावेश आहे. या आठवड्याच्या प्रत्येक दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने परभणीकरांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरूवारी २१ मे रात्रीच शहरातील दोन व ग्रामीण भागातील दोन असे चार संशयीत रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्याआधी बुधवारी २० मे रोजी एकदम नऊ रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळले होते. त्या आधीच्या दोन दिवसांत प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे गुरूवारी रात्रीपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 झाली होती.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव परभणी जिल्ह्यात वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विभागीय महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकर हे आज शनिवार, २३ मे जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. दौऱ्यात ते जिल्हाधिकारी कार्यालयात टास्क फोर्सच्या वरिष्ठ अधिका-यां बरोबर बैठकीद्वारे आढावा घेणार आहेत. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ वर पोचली आहे. विशेषतः परजिल्ह्यातील अधिकृत, अनाधिकृतपणे परतलेल्या व्यक्ती व कुटुंबियांचेच स्वॅब पॉझीटीव्ह आढळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या